
सोमाटणे : गहुंजे-साळुंब्रे गाव जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण, काही जमीनदारांच्या संमतीअभावी रस्ता न झाल्याने नागरिकांचा पवना नदीतून धोकादायक प्रवास सुरूच आहे.साळुंब्रे-गहुंजे ही गावे जोडणाऱ्या पूर्वीचा साकव पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यावर या मार्गावरील वाहतूक बंद होत होती. या काळात नागरिकांना साळुंब्रेमार्गे गहुंजे-देहूरोडला जाताना सोमाटणेमार्गे दूरच्या अंतरावरुन वळसा घालून जावे लागत होते. यात नागरिकांचा नाहक वेळ व इंधनाचा अपव्यय होत होता.