esakal | 'खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण जाहीर करा' 
sakal

बोलून बातमी शोधा

'खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण जाहीर करा' 
  • कुस्ती क्षेत्रातून मागणी; शहरात मल्लांची एकजूट 

'खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण जाहीर करा' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी कुस्ती क्षेत्रातून सातत्याने होत आहे. यावर्षी पुरस्काराची घोषणा व्हावी यासाठी सर्व मल्लांनी एकत्र येऊन जोर लावावा, असे आवाहन त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी केले. याला पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेने प्रतिसाद दिला आहे. शहरातील सर्व मल्लांची एकजूट राहील, असा विश्‍वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारत केसरी विजय गावडे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे यांनी जाधव यांची यांची सांगलीत भेट घेतली. "राज्य सरकारने पद्मविभूषणसाठी नामांकन केले आहे. आता यापुढेही लढाई अजून बाकी आहे. खाशाबा जाधव यांना या अगोदरच सन्मानित करायला हवे होते. आम्ही आजवर खूप प्रयत्न केले. केंद्र सरकारकडे वेळोवेळी माहिती देऊनही निराशा पदरात पडत आहे. परंतु खचून न जाता नव्या उमेदीने उभारी बांधून प्रयत्न करायचे सोडणार नाही. योग्य सन्मान होत नाही, तोपर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहोत,'' असे रणजित जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी केलेली लाल मातीतील कुस्तीची सेवा आणि केलेली पैलवानकी पुरस्कार मिळेल त्यावेळी सार्थकी लागेल, असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"आपण द्याल ती जबाबदारी योग्यरीतीने पार पाडू. या संदर्भात लोकचळवळ उभी करणे गरजेची आहे. तमाम महाराष्ट्रातील पैलवान मंडळींना एकत्रित करून खाशाबा जाधव यांना जोपर्यंत मान मिळत तोपर्यंत ही जनजागृती थांबणार नाही.'' 
- हनुमंत गावडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ