Sant Tukaram Maharaj Beej celebration
sakal
देहू - संत तुकाराम महाराज यांचा ३७८ वा बीज सोहळा इंद्रायणी नदीच्या तीरावर भक्तिभाव, उत्साह आणि परंपरेनुसार साजरा झाला. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘तुकाराम...तुकाराम’ या अखंड नामघोषात गुरुवारी अवघी देहूनगरी दुमदुमली. वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली.