
पुणे : मावळ, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्क आणि पुण्याला जाण्याच्या दृष्टीने देहूरोड सेंट्रल चौक महत्त्वाचा आहे. मात्र, चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावर शनिवार आणि रविवारी तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.