
पिंपरी : पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागील जागा रमाबाई आंबेडकर स्मारकासाठी मोकळी ठेवावी, तसेच स्मारकाचे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीचे पदाधिकारी, आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.