esakal | Pimpri : 'अटल आहार योजना' पुन्हा सुरु करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri : 'अटल आहार योजना' पुन्हा सुरु करण्याची मागणी

Pimpri : 'अटल आहार योजना' पुन्हा सुरु करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अटल आहार योजने’अंतर्गत अल्पदरात भोजन ही योजना कामगार नाक्यांवर बंद करण्यात आली. शहरातील विविध कामगार नाक्यांवर येणाऱ्या लाखो कामगारांना मिळणाऱ्या एक वेळचे भोजन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पतित पावन कामगार महासंघाने कामगार उपायुक्तांकडे केली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्याठिकाणी राज्यातील आणि परराज्यातील काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्पावर काम संथगतीने सुरू आहेत. अशात रोज सकाळी लाखोंच्या संख्येने कामगार नाक्यांवर उभे राहणाऱ्या सर्वच कामगारांना रोजच काम मिळेल की नाही याबद्दल काही शाश्वती नसते. अशातच कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजना लागू केली आहे.

हेही वाचा: शिक्कामोर्तब! महिलांसाठी NDAतून सैन्यात अधिकारी होण्याचा मार्ग खुला

या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी किंवा कामगार नाक्यावर मोफत जेवण पुरविण्यात येते. शेकडो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आपले पोट भरण्यासाठी ही योजना लाभदायी ठरली. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अटल आहार योजना बंद करण्यात आली. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे कामच बंद असल्याने कामगार बांधकामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. कामगार नाक्यावर पूर्ववत तातडीने ही योजना सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.”

loading image
go to top