
पिंपरी : कोरोना विषाणूंचा वाढत्या संसर्गामुळे घरात वाढलेली माणसांची संख्या, वाढणारा उन्हाचा कडाका या कारणांमुळे शहरातील सोसायट्यांकडून पाण्याच्या मागणीत 40 टक्यांनी वाढ झाली आहे. वाढलेली पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी इथल्या लहान मोठ्या सोसायट्यांना येणारा महिन्याचा खर्च साडेचार कोटी रुपयांच्या घरात जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहरातल्या अनेक भागातील सोसायट्यांना दरवर्षी उन्हाळ्यात टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. यंदा मात्र, इथली परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे अनेक लोक घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे दिवसभरात होणारा पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये घराच्या स्वच्छतेसाठी पाणी खर्च होण्याचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, महापालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे त्या पाण्यात सोसायट्यांतील सभासदांना भागवणे कठीण जात आहे. वाढलेली माणसांची संख्या आणि प्रत्यक्षात आवश्यक असणारी पाण्याची गरज यातला फरक दूर करण्यासाठी सोसायटीच्या सभासदांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे.
सोसायट्यांच्या देखभालीचे बजेट वाढले
दरम्यान, पाण्याच्या वाढत्या वापरामुळे सोसायट्यांमधील सभासदांकडून दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या मेंटेनन्सच्या खर्चाचे प्रमाण 30 ते 40 टक्यांनी वाढले आहे. मात्र, पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सभासद हा वाढीव खर्च सहन करत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या भागात पाण्याची मागणी सर्वाधिक
शहरातील पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, रावेत, पुनावळे या भागातील सोसायट्यांना पाण्याची गरज भागवण्यासाठी टॅंकरचा आसरा घ्यावा लागत आहे.
...असे आहे अर्थकारण
पाण्याच्या 10 हजार लिटरच्या एका टॅंकरसाठी 900 रुपये मोजावे लागत आहेत. शहरात तीन हजाराच्या आसपास सोसायट्या असून, त्यामधील बहुतेक ठिकाणी टॅंकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. 500 ते 700 फ्लॅट असणाऱ्या एका सोसायटीला दिवसाला 30 ते 32 टॅंकर, 200 फ्लॅट असणाऱ्या सोसायटीला 12 ते 15 आणि 100 फ्लॅट असणाऱ्या सोसायटीला सात ते आठ टॅंकर लागतात.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
500 ते 700 फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांची संख्या 500 असून, त्यांना महिन्याला पाण्यासाठी सुमारे एक कोटी 44 लाख रुपये, 200 ते 250 फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांची संख्या दोन हजाराच्या आसपास असून, त्यांना दोन कोटी 70 लाख रुपये तर शहरात 100 फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांची संख्या 500 आहे, त्यांना 36 लाख रुपये खर्च करावे लागतात, ही रक्कम साडेचार कोटी रुपयांपर्यंत जाते.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"दरवर्षी उन्हाळात पाण्याची मागणी वाढते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे पाण्याचा वापर वाढला आहे, त्यामुळे सोसायट्यांकडून दररोज मागवण्यात येणाऱ्या टॅंकरच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सोसायट्यांचा टॅंकरवर होणारा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने पाणी वाढवून द्यायला हवे."
- सुदेश राजे, सदस्य, पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.