वाकड - चिंचवड-डांगे चौक-हिंजवडी रस्त्याच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी महापालिकेने वाकड काळाखडक परिसरात बुधवारी (ता. १६) पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. यात ४६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील ४० दुकाने आणि ५६ घरे जमीनदोस्त केली. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला.