social media
sakal
पिंपरी - महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगात आलेला असताना शहरातील खरेखुरे नागरी प्रश्न मात्र दुय्यम ठरत आहेत. यात रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, वाढती वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्याऐवजी सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार आपले नाव चर्चेत ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी उमेदवारांचा उथळपणा अधिक वाढत आहे.