आपत्ती व्यवस्थापनाचे तरूणांना लोणावळ्यात धडे

आपत्ती व्यवस्थापनाचे तरूणांना लोणावळ्यात धडे

लोणावळा, ता.११ : सध्या तरुणाईमध्ये साहसी पर्यटनाचे वेड वाढत आहे. अनेकदा पर्यटक वाट चुकल्याच्या, अपघाताच्या घटना घडत आहेत. यंदा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर, शिवदुर्ग मित्र, लोणावळा व जीवरक्षक दल, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळणे यासारख्या कठीणप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलिस दलाच्यावतीने स्थानिक बचाव पथक आणि गिर्यारोहक यांना पाचारण करण्यात येत असते. निरनिराळ्या प्रकारच्या दुर्घटना वाढत असताना मदत कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर हे आपत्कालीन बचाव प्रशिक्षण शिबिर पार पडले.
शिवदुर्ग मित्र मंडळाचे महेश म्हसणे, ज्येष्ठ गिर्यारोहक सचिन गायकवाड, सुनील गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, आदित्य बेलावणे, रतन सिंग, करण वरे यांनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी तरुण, तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. बचाव मोहीम राबवत असताना येणाऱ्या जबाबदाऱ्या, आपली भूमिका, विविध तांत्रिकदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज, विविध बचाव मोहिमेत वापरले जाणारी अद्ययावत उपकरणे आणि साधनांबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर ही साधने हाताळून सराव करण्याची संधी शिबिरार्थींना देण्यात आली. जीवरक्षक दलाचे संस्थापक समीर चौधरी, सदस्य रमेश डिंगोरे, तन्मय निमसे, प्रशांत शिराळ आदी यावेळी उपस्थित होते. रवींद्र पानसरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. भूषण विशे यांनी सूत्रसंचालन केले. शिवदुर्ग मित्र याच्याकडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com