

ST Bus
Sakal
पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) दिवाळीनिमित्त पुणे विभागातून ५८९ जादा गाड्या सोडणार आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या गाड्या सोडण्यात येतील.वल्लभनगर आगारातून सर्वाधिक ३९६ गाड्या सोडण्यात येतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, व्यवसाय आणि कामानिमित्त अनेक जण पिंपरी चिंचवड, पुण्यात स्थायिक झाले आहेत. दिवाळीत शाळा, महाविद्यालयांसुट्टी नसल्यामुळे लोक हमखास त्यांच्या गावी जातात.