असंवेदनशीलतेचा कळस! बिल्डिंगच्या टेरेसवरुन फेकून कुत्र्याचा घेतला जीव

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

पुण्यात गव्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपळे गुरव येथे घडलेल्या या घटनेवरून विकृती प्रवृतीचे लोक मुक्‍या जनावरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

पिंपरी : इमारतीवरून खाली फेकल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली. या घटनेबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फरीनजहॉं विसाल शेख (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकीरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाच्या भटक्‍या कुत्र्याला अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकले.

मंचर नगरपंचायत तळ्यात-मळ्यात; इच्छुक उमेदवार व नागरिक संभ्रमात​
 

सुदर्शननगर, सृष्टी चौक येथे शनिवारी (ता.12) दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झाल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 429 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कुत्र्याला नेमके कोणत्या इमारतीवरून टाकण्यात आले, आरोपी कोण आहे याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

दरम्यान, पुण्यात गव्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपळे गुरव येथे घडलेल्या या घटनेवरून विकृती प्रवृतीचे लोक मुक्‍या जनावरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

भारतीयांना लसीबाबत मिळणार मोठा दिलासा! पुनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog dies after being thrown from a building terrace in pimple Gurav Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: