घरपोच किराणा अन् भाजीपाला हवाय, तर 'हे' अॅप डाउनलोड करा

घरपोच किराणा अन् भाजीपाला हवाय, तर 'हे' अॅप डाउनलोड करा

Published on

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे किराणामाल, भाजी खरेदी करण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेत लोक बाहेर पडतात. मात्र, सोसायट्यांमध्ये राहाणाऱ्या लोकांना त्यासाठी तसदी घेण्याची आवश्‍यकता नाही. कारण राज्य सरकारच्या सहकार विभागाने जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळवण्यासाठी ऍप तयार केले असून, त्यावर एका सोसायटीतील कमीत कमी 30 सदस्यांच्या ग्रुपला त्याचा लाभ घेता येणार आहे.

या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना किराणामालापासून ते फळे, भाजीपाला घराच्या दारामध्ये उपलब्ध होणार आहे. शहरातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड भागातील सोसायटीच्या सभासदांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी आतापर्यंत शहरातल्या 150 सोसायट्यांनीच याचा लाभ घेतला आहे, अन्य भागातील सोसायट्यांनी त्यासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे.

अशी करा नोंदणी...
शहरातील सोसायटीतील सभासदांनी www.mahamcdc.com या संकेतस्थळावर जाउन त्याठिकाणी हे ऍप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर गृहनिर्माण संस्थेची माहिती, सभासदांची माहिती भरुन आपल्याला आवश्‍यक असणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंची नोंदणी तिथे करायची आहे. सहकार विभागाने या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी आणि किराणामालाच्या वस्तू पुरवठादारांबरोबर करार केला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सोसायटीच्या सभासदांकडून नोंदणी झाल्यानंतर त्यांना या वस्तू ठराविक कालावधीमध्ये घरपोच देण्यात येणार आहेत. या ऍपमध्ये तृणधान्ये, पिठे, कडधान्ये, किराणामाल, तेल, मसाले, सुकामेवा, बेकरी उत्पादने, भाजीपाला, फळे, अंडी आदी नागरिकांना मागवता येणार आहे. शहरातील मोठ्या सोसायटीच्या सभासदांसाठी हा उपक्रम उपयुक्‍त ठरणारा आहे. 


कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही. सहकार विभागाने सोसायटीमध्ये राहाणाऱ्या नागरिकांसाठी तयार केलेले हे खास ऍप त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंची गरज पुरवण्यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. खरेदसाठी घरातून बाहेर पडण्यापेक्षा या ऍपवर नोंदणी केल्यास नागरिकांना ते उपयुक्‍त ठरणार आहे. शहरामध्ये तीन हजाराच्या आसपास सोसायट्या आहेत, यासर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याची आवश्‍यकता आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मालाला देखील योगय बाजारपेठ मिळणार आहे. 
- उज्वला माळशिकारे, उपनिबंधक, सहकार विभाग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com