पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Babasaheb Ambedkar jayanti Changes in traffic at Pimpri Chowk

पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुवारी (ता. १४) जयंती आहे. त्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी पिंपरी चौकात येतात. त्यामुळे, गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

असे असतील बदल

चिंचवड स्टेशनकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून डी मार्ट इनग्रेड सेपरेटर मध्ये वळविण्यात येणार आहे. नाशिक फाटयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून डेअरी फार्मग्रेड सेपरेटर इन व एच. पी. पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. तसेच स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणारा मार्ग बंद करून ही वाहतूक लिंक रोडकडे वळविण्यात येणार आहे.

तसेच, नेहरुनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद करून एच. ए. कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनीकडे वळविण्यात येत आहे. तसेच सम्राट चौक ते अहिल्यादेवी चौक पिंपरी दरम्यानचा रोड वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमधील हे बदल असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Jayanti Changes In Traffic At Pimpri Chowk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top