priya prasad, archi prasad and suraj prasad
sakal
हिंजवडी - आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद चालकाने भरधाव बस थेट पदपथावर चढवली. त्याखाली चिरडून दोन बहिणी आणि भाऊ अशी तीन सख्खी भावंडे मृत्युमुखी पडली. सोमवारी (ता. १) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पंचरत्न चौकात ही दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू झाल्याने हिंजवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.