
वाकड - मद्यधुंद भरधाव पिकअप चालकाने मोटार आणि दुचाकीला धडक दिली. हा अपघात शुक्रवारी (ता. ३१) अशोक नगर-ताथवडे गावठाण रस्त्यावरील जाधव वस्ती येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसून मोटारचालक महिला गंभीर जखमी झाली आहे.