
चिखली : उत्पादनात घट झाल्याने सुकामेव्यातील बेदाण्यांच्या (मनुके) आणि खोबऱ्याच्या भावात पूर्वीपेक्षा तीन पटीने वाढ झाली आहे. बेदाणे आणि खोबऱ्यामधील ही आजपर्यंत झालेली सर्वात मोठी दरवाढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, येत्या काही दिवसांत नवीन उत्पादन बाजारात आल्यावर खोबऱ्याचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.