पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात 'डफली बजाव' आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

महापालिकेतील गैरव्यवहाराविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप व बहुजन सम्राट सेना यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 17) दुपारी बारा वाजता महापालिका भवनासमोर 'डफली बजाव' आंदोलन केले.

पिंपरी : महापालिकेतील गैरव्यवहाराविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप व बहुजन सम्राट सेना यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 17) दुपारी बारा वाजता महापालिका भवनासमोर 'डफली बजाव' आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तीन वादकांनी सुमारे दहा मिनिटे डफली वाजवून व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत महापालिका अधिकारी व कारभाऱ्यांचा निषेध केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष निसर्गंध म्हणाले, "कोरोनाच्या काळात महापालिकेने काही साहित्य खरेदी केले आहे. मात्र, या खरेदी प्रकारात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. लॅब केमिकल, आयटीआयसाठी साहित्य खरेदी, आयसीयू युनिट, ऍनास्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सिरींज पंप खरेदी, एक्‍स-रे मशिन दुरुस्ती यासह अनेक प्रकारच्या व्यवहारात गैरव्यवहार झालेला आहे. गैरव्यवहारांची ही मालिका खंडित करण्यासाठी आम्ही आंदोलन केले.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंदोलनाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली. सर्व आंदोलक महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते. डफली वाजवायला सुरुवात केल्यानंतर पिंपरी पोलिस व महापालिका सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करीत डफली वादन बंद करायला लावले. त्यानंतर निसर्गंध व कदम यांच्या शिष्टमंडळाने महापालिका भवनात जाऊन आयुक्तांनी मागण्यांचे निवेदन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: duffly bajaw agitation against pimpri chinchwad municipal corporation