
Electric Bike
sakal
वाकड : मुंबई-बंगळुर महामार्गावर वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास चालत्या इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला. दुचाकीस्वार महिलेने प्रसंगावधान दाखवत बाइक थांबवून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेनंतर महामार्गावर तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.