esakal | अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला 
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला 

विद्यार्थी, शिक्षकांची भावना; नव्या सूचना नाहीत, संभ्रम कायम 

अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला 

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : कोरोनामुळे मार्चपासून आम्ही त्रस्त आहोत. दहावीचा भूगोल पेपरही रद्द आणि नंतर निकाल जाहीर. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे तणावमुक्त होतो. अचानक मराठा आरक्षण स्थगिती आली आणि दोन फेरीनंतर प्रवेश प्रक्रिया बंद झाली. आता ऑक्‍टोबर महिना सुरू असून, प्रवेश प्रक्रियेबाबत काहीही नव्या सूचना नाहीत. आता अभ्यासक्रम सुरू कधी होणार? प्रवेशाचे कसे होणार? असे अनेक प्रश्‍न विद्यार्थिनी श्रेया धुमाळ हिला सतावत आहेत. तिच्याप्रमाणेच या प्रक्रियेत प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराचा दहावीचा निकाल 98.49 टक्के लागला. यात 18 हजार 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परिणामी यावर्षी दहावीचा निकाल सर्वाधिक असल्यामुळे अकरावी प्रवेशामध्येही चढाओढ पाहण्यास मिळाली. उत्तम गुण मिळवूनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी अनेक विद्यार्थ्यांनी आता दुसऱ्या नियमित फेरीसाठी आरक्षणाच्या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करत पुन्हा अर्ज दुरुस्ती नोंदविल्या. त्यामुळे या जागांसाठीच्या अर्जांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या उपलब्ध जागांपैकी बारा टक्के जागांवर एसईबीसी तर दहा जागांवर ईडब्ल्यूएस आरक्षण लागू आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पुणे विभागात हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. मात्र एसईबीसी आरक्षणालाही स्थगिती मिळून प्रवेशाच्या जागांवर याचा परिणाम होऊन प्रवेशाची संधी हुकणार का? अशी भीती विद्यार्थी-पालकांना वाटू लागली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांचा काळ सुरू असताना शिक्षण विभागाने लवकर यासंदर्भातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी-पालकांमधून होत आहे. आता ऑक्‍टोबर महिना सुरू आहे. आरक्षण स्थगिती केव्हा उठणार यावरही काहीही माहिती नाही. केव्हा या सर्व गोष्टी मार्गी लागणार? असे म्हणणे कांचन पवार या विद्यार्थिनीचे आहे. तर हितेश देशमुख म्हणतो, "या आरक्षणाच्या गोंधळाचा फटका आम्हाला बसू नये. यासाठी सरकारने आरक्षण लागू करावे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अगोदरचे निश्‍चित झालेले प्रवेश निश्‍चित मानणार की पुन्हा नवीन प्रक्रिया राज्य सरकार राबविणार, याची काहीही कल्पना नाही. एसईबीसी आणि ईडब्ल्यूएसचे आरक्षण मिळालेले विद्यार्थी आहेत. नवीन प्रक्रियेत हे आरक्षण मान्य केले नाही तर त्या मुलांवर अन्याय होईल. 
- प्रा. भावना काळे, श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी