इंधन दरवाढ नको; नोकरदार, वाहतूक व्यावसायिक वैतागले 

इंधन दरवाढ नको; नोकरदार, वाहतूक व्यावसायिक वैतागले 

पिंपरी : "डिझेलची दरवाढ झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीचे नुकसान झाले आहे. 10 ते 12 रुपये प्रती किलोमीटर दराने व्यवसाय करणे अवघड झाले आहे. आम्ही बेरोजगारांनी कर्जे काढून गाड्या घेतल्या आहेत. बॅंकांचे हप्ते भरता येत नाहीत. सरकारने पेट्रोल-डिझेलला जीएसटी करप्रणाली लावावी, महसूल वाढवण्यासाठी इंधन दरवाढ नको. कोरोनाशी तोंड देताना व्यवसाय बंद असल्यामुळे गाडीचे हप्ते व्याजाने पैसे काढून भरले. त्यांच्यामध्ये कसाबसा थोडासा व्यवसाय होत असताना, सरकारने डिझेलचे दर वाढवून अजून आम्हा वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आणली आहे," असे सांगत होते प्रवासी वाहतूकदार राहुल सोनवणे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक चटके सोसत असलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. 

'अनलॉक'मध्ये पेट्रोल दरवाढीचा मीटर नव्वद रुपयांच्या घरात पोचला आहे. पेट्रोलची किंमत 89.44 रुपये झाल्याने सर्वसामान्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया...

अर्चना पवार व सोनाली मन्हास (गृहिणी, चिंचवड) : सतत सहा महिने इंधन दरवाढ होत आहे. भाजीपाला, फळे, अन्नधान्याची दरवाढ पाच रुपयाने झाली. तेलाच्या पिशवीला 15 रुपये जास्त द्यावे लागत आहेत. सरकारने मालवाहतुकीच्या खर्च वाढवून ठेवला आणि आता महागाईमुळे स्वयंपाक घरात शिजवायच काय?

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उर्जित पानशेट्टी व नीतेश कांबळे (माहिती तंत्रज्ञान) : जागतिक बाजारात क्रूडचे भाव 46 डॉलर प्रति बॅरल आहेत. मात्र, कोरोना काळापासून सरकारने पेट्रोलची दरवाढ एका लिटरमागे सरासरी 40 रुपये केली आहे. आमचे पगार वाढले नाहीत, महिन्याचा इंधन खर्च 1200 रुपयाने वाढला आहे. सरकारने तिजोरी भरण्यासाठी अतिश्रीमंत वर्गाकडून कर घ्यावा. दारू, तंबाखू, सिगारेटवर करवाढ करावी. आमच्या खिशात हात घालू नये.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तानाजी बांदल (निवृत्त अधिकारी टाटा मोटर्स) : बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तानपेक्षा आपल्या देशात पेट्रोलचे दर जास्त आहेत. एकदेश एक करप्रणाली मग पेट्रोल डिझेलला जीएसटी लावा. तिजोरी भरण्यासाठी लिटरला रुपये 40 कर लावून सरकार उत्पादन क्षेत्रात मंदी निर्माण करत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com