
पिंपरी : महापालिकेचा समाज विकास विभाग बचत गटांतील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘सक्षमा’ प्रकल्प राबवीत आहे. याअंतर्गत जागृती आणि गुरुकृपा महिला बचत गटाच्या महिलांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तीन हजार १४५ स्कूल बॅग शिवून तब्बल १२ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.