
पिंपरी : हिंजवडी, माण, मारुंजी भागांतील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण करण्यात आलेले रस्ते खुले करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण केलेला हिंजवडी फेज २ विप्रो सर्कल ते मारुंजी, लक्ष्मी चौकदरम्यानचा रस्ता गुरुवारी (ता. ३) वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.