esakal | ‘टीम ॲम्बुष’चे कांदा काढणी यंत्र देशात प्रथम

बोलून बातमी शोधा


‘टीम ॲम्बुष’चे कांदा काढणी यंत्र देशात प्रथम
‘टीम ॲम्बुष’चे कांदा काढणी यंत्र देशात प्रथम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या टीम ॲम्बुषने टिफण-२०२० अर्थात टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फॉरम फॉर ॲग्रिकल्चर नर्चरिंग या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. कोरोनामुळे ऑनलाइन झालेल्या स्पर्धेत ॲम्बुषने ‘कांदा काढणी यंत्र’ सादर केले होते.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स व जॉन डिअर इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा पहिला टप्पा व्हर्चुअल राउंड व्हीआयटी पुणे येथे झाला. त्यात १०८ महाविद्यालयांनी कांदा काढणी यंत्राच्या डिझाईन सादर केल्या. ४२ महाविद्यालये दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आले. त्यात डिझाईनप्रमाणे यंत्र म्यॅनुफ‌ॅक्चर करून प्रदर्शित करायचे होते.

पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम ॲम्बुषने कमीत कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे चार चाकी स्वयंचलित कांदा काढणी यंत्र विकसित करून मांडले. त्यांनी प्रथम क्रमांकाचे दीड लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. तसेच ‘बेस्ट डिझाईन अवॉर्ड’ श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावत वीस हजार रुपयांचे पारितोषिकही पटकावले. टीम ॲम्बुषचे शंतनू जगताप, सुनील लगड, सत्यजित इथापे, मिरज नेमाडे, आदित्य गोंधळी, श्रीशैल माळी, मनीषा पाटील, श्रुती बर्डे, दैदिप्या इनामदार, शिवम ठोंबरे, तुषार राणे, अथर्व कुंटे, कोमल बेंडले, अक्षदा क्षीरसागर, निखिल डहाके, वेदांत आरोटे, शार्दूल तेग्गी, समीर कुलकर्णी, श्‍लोक गंगातीरकर, ओम बडगुजर, श्रेयस चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश होता. फॅकल्टी ॲडव्हायझर म्हणून प्रा. ईशान साठोने यांनी कार्य केले. जॉन डिअर इंडियाचे टेक्निकल ॲडव्हायझर केदार बैरत, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्टरॲक्षणचे असोसिएट डीन डॉ. नरेंद्र देवरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.पद्माकर देशमुख, रिसर्च अँड इनोव्हेशनचे डीन डॉ. एस. एस. लाकडे यांनी मार्गदर्शन केले.

पारितोषिक वितरणप्रसंगी टिफन-२०२० चे संयोजक विवेक जोशी, जॉन डिअर इंडियाचे जनरल मॅनेजर कृष्णांत पाटील, एसएई दक्षिण विभाग अध्यक्ष संजय निबंधे, एक्स्पर्ट ग्लोबलचे संचालक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डी. पी. लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचे वैशिष्टे

टिफण-२०२० राष्ट्रीय स्पर्धेसाठी कृषिक्षेत्रात विविध कामे कमीत कमी मनुष्यबळ वापरून सुलभ व सुरक्षितरित्या करण्यासाठी विविध उपकरणे प्रात्यक्षिक बनवून सादर करावे लागते. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान व संशोधनाद्वारे मानवी जीवनस्तर अधिक उंचावण्यासाठी पीसीईटीच्या सर्व महाविद्यालयातून ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला’ प्रोत्साहन व विविध तांत्रिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते.