पिंपरी - उद्यमशील युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, राज्य आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, १० व ११ जानेवारीला ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५ (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, राज्य आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.