'पिंपरी-चिंचवडकरांचा मिळकतकर माफ करा'

'पिंपरी-चिंचवडकरांचा मिळकतकर माफ करा'

नवी सांगवी : लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांकडे पैसेच नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा मिळकतकर महापालिकेने माफ करावा, अशी मागणी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.

अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. पैसाच हातात नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. त्यामुळे मिळकतकर भरण्यासाठी त्यांच्यामागे तगादा लावणे उचित होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदीमुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मिळकतकर घेऊ नये. शहरातील सर्व नागरिकांचा मिळकत कर सरसकट माफ करण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com