Video : स्वत:चे प्राण गमावून वाचविला मालकाचा जीव; कशी घडली ही दुर्दैवी घटना...वाचा

Video : स्वत:चे प्राण गमावून वाचविला मालकाचा जीव; कशी घडली ही दुर्दैवी घटना...वाचा

पिंपरी : तो खिलारी जातीचा बैल. एरवी दररोज शेतातील गोठ्यात बांधलेला असायचा, पण गुरुवारी (ता. 14) अचानक पाऊस पडू लागल्याने मालक रविंद्र येळंवडे यांनी त्याला झाडाला तात्पुरते बांधले. पण वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला आणि विद्युत तारा तुटून नेमक्‍या त्याच्या अंगावर पडल्या आणि मुका जीव कायमचा शांत झाला. जर तो गोठ्यात बांधलेला असता, तर तारा गोठ्यावर पडल्या असत्या आणि नेहमीप्रमाणे चारा टाकण्यासाठी आलेल्या मालकाला खाली पडलेल्या तारांचा शॉक लागला असता. पण या मुक्‍या जनावरांने मालकाचा जीव वाचविला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात वादळी वाऱ्यासह गुरवारी पाऊस झाला. उच्चदाबाचा विजेचा प्रवाह वाहून नेणारी तार अंगावर पडल्याने चऱ्होलीगावातील बैलाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या बैलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या बैलाची अंदाजे किंमत तीन लाख होती. शेतात झाडाला बांधलेल्या या बैलाचा अंगावर अचानक महावितरणच्या तारा तुटून पडल्याने रविंद्र ज्ञानेश्‍वर येळवंडे या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला. येळवंडे यांच्या शेतावरून मोशी विद्युत उपकेंद्राची हायटेन्शन विजतारा गेलेल्या आहे. या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी केली. परंतु, सरकारी डॉक्‍टर उपलब्ध न झाल्याने घटनेचा पंचनामा केला नाही. शुक्रवारी (ता. 15) सकाळी सरकारी डॉ. मेटकरी यांनी शवविच्छेदन केले. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व या घटनेचा पंचनामा केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वीजतारा बदलण्याकडे केले दुर्लक्ष

महावितरणच्या मुख्य वीजतारा जणू मृत्यूचा सापळा ठरत आहेत. देखभाल व दुरुस्ती कागदावरच असून, वारंवार तार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. शॉर्टसर्किट होणे, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आल्या नसल्याने तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. येळवंडे यांनी गेल्या दोन वर्षापासून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वीजतारा बदलण्याची मागणी केली होती. पण महावितरणने दुर्लक्ष केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com