पिंपरी-चिंचवड शहरात पंधरा जणांचा मृत्यू; 835 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात 835 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 72 हजार 476 झाली आहे.

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात 835 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 72 हजार 476 झाली आहे. आज 557 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत एकूण 62 हजार 255 रुग्ण बरे झाले आहेत. आज 16 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 15 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत 1190 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या आठ हजार 734 रुग्ण सक्रिय आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपळे गुरव (पुरुष वय 84), काळेवाडी (पुरुष वय 51, 70 व स्त्री 69), देहूरोड (पुरुष 64), आकुर्डी (पुरुष वय 64, स्त्री वय 23), चिखली (स्त्री वय 65 व पुरुष वय 81), पिंपले सौदागर (पुरुष वय 54), चिंचवड (पुरुष वय 72), वाकड (पुरुष वय 40), रहाटणी (पुरुष वय 75), संत तुकारामनगर (पुरुष वय 47), पिंपरी (पुरुष वय 72) आणि आळंदी (पुरुष वय 43) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen killed in Pimpri-Chinchwad