
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून पिंपरीतील खराळवाडी येथे दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. कोयता, चॉपरने वार करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने दोन्ही कुटुंबातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सतीश पांडुरंग भांडेकर (वय 40, रा. पीजे चेंबर्सच्या पाठीमागे, गांधीनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय शिंगाडे (वय 30), विजय शिंगाडे (वय 32), दिनेश शिंगाडे (वय 27), चंद्रकांत शिंगाडे (वय 55, सर्व रा. भागवत गिता मंदीराजवळ, खराळवाडी, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता.14) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादीचे भाऊ मुकेश पांडुरंग भांडेकर (वय 30) हे गांधीनगर येथे असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी चॉपरने तोंडावर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तर दिनेश विलास शिंगाडे (वय 29, रा. शिंगाडे चाळ, खराळवाडी, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्ता भांडेकर (वय 35), सतिश भांडेकर (वय 30), मुकेश भांडेकर (वय 30), आशु भांडेकर (वय 19), अनिकेत भांडेकर (वय 25, सर्व रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता.14) रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे घराबाहेर बसलेले असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दत्ता भांडेकर, सतिश भांडेकर, मुकेश भांडेकर यांनी फिर्यादीवर चॉपर, कोयता व ब्लेडने वार केले. तर आशु भांडेकर व अनिकेत भांडेकर यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.