आकुर्डीत दोन टोळ्यांमध्ये राडा; परिसरात दहशतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

बुधवारी (ता. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी पांढारकर सभागृहाच्या आवारात असताना आरोपी तेथे आले. आरोपींनी संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी खाऱ्या जगताप याला शिविगाळ करीत सिमेंटच्या गट्टूने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत निर्माण केली.

पिंपरी : अनेक दिवसांपासून शांत असलेल्या आकुर्डीतील गुन्हेगार टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आकुर्डीत दोन टोळ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून याप्रकरणी प्राणघातक हल्ल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

साहिल ऊर्फ खाऱ्या तानाजी जगताप (वय 22, रा. बौद्धनगर, आकुर्डी) याने गुरुवारी (ता. 18) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बॉबी ऊर्फ सुरेश यादव (वय 30), विकी ऊर्फ कांच्या वाघ (वय 22), सनी सरपट्टा (वय 26), गुंड्ड्या सरपट्टा (वय 25), प्रसाद ऊर्फ लंब्या सुतार (वय 27, सर्व रा. पंचतारानगर, आकुर्डी), कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही), जिग्नेश सावंत (वय 27, रा. सुखवानी प्लाझा, आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही घटना बुधवारी (ता. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी पांढारकर सभागृहाच्या आवारात असताना आरोपी तेथे आले. आरोपींनी संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी खाऱ्या जगताप याला शिविगाळ करीत सिमेंटच्या गट्टूने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तर निलावती शंकर माळी (वय 50, रा. भाऊ पाटील चाळ, आकुर्डी) यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीनुसार खाऱ्या जगताप, बाबू सुर्वे, शंकर दाते, नितीन सोनवणे, कृष्णा इटकर, सलम्या खान, आबु शेख, सोया रट्टे, सनी तलवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता.17) रात्री अकराच्या  सुमारास भाऊ पाटील चाळ, आकुर्डी येथे घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादीसह त्यांची मुलगी, मुलगा व शेजारी राहणारा ओंकार यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडके, दगड, विटांनी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी वाचा - पुण्यातली कॉलेज पुन्हा बंद होणार?

दरम्यान, यापूर्वीही या दोन गटात अनेकदा वर्चस्ववादातून वाद झाले आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून आकुर्डीतील टोळ्या शांत होत्या. दरम्यान, बुधवारी या टोळ्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting between two gangs in Akurdi