Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-५४८डी हा रस्ता विकसित करण्याच्या कामाचा अंतिम अध्यादेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव शैलेंद्र बोरसे यांनी काढला.
talegaon Chakan Shikrapur Road Survey

talegaon Chakan Shikrapur Road Survey

sakal

Updated on: 

तळेगाव स्टेशन - महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत रचना करा, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (डी.बी.ओ.टी.) तत्वावर तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-५४८डी हा रस्ता विकसित करण्याच्या कामाचा अंतिम अध्यादेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव शैलेंद्र बोरसे यांनी शुक्रवारी (ता. २७) काढला आहे. या रस्तेकामाच्या निविदा स्विकृतीनंतरच्या अंतिम प्रस्तावास गेल्या मंगळवारी (ता. २४) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com