esakal | होय, हॉटेल विकायचंय; व्यावसायिकांनी का घेतला हा निर्णय वाचा...

बोलून बातमी शोधा

होय, हॉटेल विकायचंय; व्यावसायिकांनी का घेतला हा निर्णय वाचा...
  • तीन महिन्यांचे भाडे थकले
  • भाडे वसूल करण्यासाठी मालकांचा तगादा
  • फूड डिलिव्हरीलाही मिळेना प्रतिसाद

होय, हॉटेल विकायचंय; व्यावसायिकांनी का घेतला हा निर्णय वाचा...

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल व्यावयायाला खीळ बसली आहे. 22 मार्चला लॉकडाउन सुरु झाल्यापासून हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याने भाडेतत्त्वावर असलेल्या व्यावसायिकांचे हॉटेल भाडे थकले आहे. यातील काही बड्या व्यावसायिकांनी चक्क हॉटेल व रेस्टॉरंट सेटअपसह विक्रीला काढले आहेत, तर काही हॉटेल मालकांनी फूड डिलिव्हरी व्यवसायाकडे वाटचाल सुरु केली आहे. मात्र, त्यासही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण व लोणावळा या भागात चार हजारांच्या आसपास हॉटेल व रेस्टॉरंट आहेत. निम्म्यांहून अधिक व्यावसायिकांचे हॉटेल भाडे तत्त्वावर आहेत. या हॉटेलचे भाडे दोन ते तीन लाखांपर्यंत आहे. काहींचे हॉटेल निसर्गरम्य वातावरणासह राहण्याच्या व इतर सोयीसुविधेंसह उपलब्ध असल्याने त्याचेही शुल्क वेगळे आहे. याशिवाय हॉटेलमधील स्पेशल शेफचे पगार व इतर मनुष्यबळाचा प्रश्‍नही आता समोर उभा ठाकला आहे. यातील बरेच परप्रांतीय मदतनीस गावी गेल्याने ते संकट देखील समोर उभे राहिले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे महाभयाण संकट ओढवल्याने खवैय्यांनी देखील आता हॉटेलिंग बंद केले आहे. त्यामुळे शासनाने परवानगी दिल्यानंतरही हा व्यवसाय कितपत तग धरेल. लहान मुलांना व ज्येष्ठांना देखील हॉटेलमध्ये घेऊन जाणे नागरीक नापसंत करतील. बड्या हॉटेल व्यावसायिकांकडे काही प्रमाणात खवैय्यांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याचे चिंचवड येथील हॉटेल व्यावसायिक रुपेश धुमाळ यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हॉटेलमध्ये होणाऱ्या बर्थडे पार्टी, कॉन्फरन्स बैठका, रिसेप्शन, प्रेस कॉन्फरन्स, मीटिंग सेलिब्रेशनसह विविध कारणांसाठी हॉटेल भाड्याने दिले जात असत. मात्र, ही देखील कमाई सध्या या व्यावसायिकांची ठप्प झाली आहे. यातून जवळपास मोठ्या व्यावसायिकांना महिन्याकाठी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळत असे. यातील काही हॉटेलांचे सलग महिनाभर बुकिंग होत. यापैकी बऱ्याच हॉटेलमध्ये आजही चायनीज स्पेशल सुप्रसिद्ध आहे. त्या व्यावसायिकांना देखील आता चायनीज बायकॉटमुळे चिंता सतावत आहे.

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट 

मी फूड डिलिव्हरी व्यवसाय बॅचलर मुलांसाठी सुरु केला आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. घरोघरी पार्सल पोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा तुटवडा असल्याचे हॉटेल व्यावसायिक दिलीप उमाप यांनी सांगितले.

सोशल मीडियावर जाहिरात

हॉटेल विकणे आहे. अशा जाहिराती सोशल मीडियावर फिरण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण सेटअपसह वीज, पाणी, सुसज्ज बैठक व्यवस्था, व स्वच्छतागृहांची सोय अशा आशयाच्या या पोस्ट आहेत. पिंपळे सौदागर व वाकड मधील हॉटेल व्यावसायिकांनी देखील जाहिराती केल्या आहेत.

आमच्या व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे. पूर्ण व्यवसाय उभारीस येईल असे वाटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदनाद्वारे हॉटेल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. काहींनी हॉटेल विक्रीला काढले आहेत हे खरे आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांची गुंतवणूक आहे. त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीत हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडणार आहे.

- पद्मनाभ शेट्टी, हॉटेल असोसिएशन अध्यक्ष, पुणे