Fire Accident : काळाखडक येथील रेडियम दुकान जळून खाक

मुख्य केंद्रासह रहाटणी व थेरगाव अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल
fire accident wakad kalkhadak radium shop burnt fire brigade
fire accident wakad kalkhadak radium shop burnt fire brigadesakal

वाकड : काळाखडक येथील श्री साईन रेडियम आर्ट्स या दुकानाला सोमवारी (ता. २४) सकाळी साडे सातच्या सुमारास शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले. मुख्य केंद्रासह रहाटणी व थेरगाव अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अर्ध्या तासात जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

नवनाथ मुंढे यांच्या मालकीचे हे दुकान असून दुकानावरून महावितरणची उच्चदाब वीज वहिनी गेली आहे. त्या तारेला सकाळी एक कावळा चिटकल्याने त्याने पेट घेतला हा पेटता कावळा दुकानावर पडल्याने आग लागली. आगीत रेडियम डिझाईन करणारी ब्लेझर मशीन, प्लॉटर, वेल्डिंग मशीन, दोन संगणक कक्ष,

टेबल खुर्च्या, फर्निचर, कागदपत्रे असे सुमारे सहा लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. वाकड पोलिसांनी पंचनामा केला आहे मात्र, यापैकी कशालाही विमा नाही. तत्पूर्वी झोपडपट्टीतील ही घटना असल्याने इतरत्र आग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून अग्निशामक दलाने तीन बंब पाचारण केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com