औद्योगिक सुरक्षा सप्ताह : 'सुरक्षेचे नियम पाळा, धोका टाळा'

औद्योगिक सुरक्षा सप्ताह : 'सुरक्षेचे नियम पाळा, धोका टाळा'

पिंपरी : सुरक्षा साधने वापरण्यास टाळाटाळ किंवा आळस, तसेच अति आत्मविश्वास यामुळे कारखान्यांमध्ये लहान-मोठे अपघात होतात. आपल्या कुटुंबाच्या व एकूणच देशाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे, उपकरणांचा वापर करणे आणि एकूण सुरक्षितता विषय गांभीर्याने घेणे ही काळाची गरज झाली आहे, असे मत महापालिका अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी व्यक्त केले. औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. 

औद्योगिक सुरक्षा म्हणजे काय? 
- औद्योगिक कारखान्यांमध्ये २४ तास सुरू असलेली विविध यंत्रे आणि त्यांचे क्लिष्ट प्रक्रियांशी संबंधित तेथील कामगारांच्या सुरक्षिततेची व जीविताची सुरक्षा आपण समजून घेणे आवश्यक आहे. कामगार ज्या कंपनीमध्ये, ज्या यंत्रावर, ज्या परिस्थितीमध्ये, जे काम करत असतो, ते आपले काम, यंत्र व त्याचे तंत्र व्यवस्थित शास्त्रीयदृष्ट्या बारकाव्यानिशी समजून घेणे म्हणजेच औद्योगिक सुरक्षा. यंत्रामधील व कामकाजाशी संबंधित धोके याची पूर्ण माहिती घेणे, त्याची जाण असणे, त्याच्या अनुषंगाने संभाव्य धोके कसे टाळता येतील, त्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपाययोजना व सुरक्षित साधने यांचे ज्ञान व परिपूर्ण वापर करणे म्हणजे सुरक्षाच आहे. 

सुरक्षा पद्धत व व्यवस्था कशी असावी? 
- औद्योगिक, अभियांत्रिकी, रासायनिक, धोकादायक, अति धोकादायक आदी स्वरूपाचे लहान-मोठे अनेक उद्योगधंदे असतात. जेथे अनेक अकुशल ते प्रशिक्षित कामगार असतात. याठिकाणी बऱ्याचदा अनाहूतपणे किंवा अतिआत्मविश्वासामुळे किरकोळ, गंभीर दुर्घटना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे, याचा विचार करून कामगाराने व उद्योग व्यवस्थापनाने सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. उदाहरणार्थ... हेल्मेट, सेफ्टी गॉगल्स, आवश्यकतेप्रमाणे इअर मफ, हॅंड ग्लोव्हज, बॉडी हार्नेस-ॲप्रन, बॉयलर सूट अथवा इतर सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगाराने धारण करणे गरजेचे आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनाचीही ती जबाबदारी आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय येतात अडचणी? 
- कंपनी परिसरच नव्हे तर आता शहरामध्ये स्थापत्य, विद्युत विषयक अनेक विकास कामे सध्या सर्व शहरात सुरू आहेत. उदाहरणार्थ... उंच इमारतींची बांधकामे, मेट्रो, बीआरटी, वेगवेगळ्या प्रकारचे केबल टाकण्यासाठीची खोदाई, उत्खनन आदी ठिकाणी मानवी सुरक्षा महत्त्वाची असते. येथेही सुरक्षा साधनांबरोबरच कामाच्या पद्धतीतही सुरक्षित प्रणाली अवलंबणे तितकेच महत्त्वाचे आहे. तीन वर्षांपूर्वी दापोडी येथे नदीजवळ प्रचंड मोठ्या खोदाईचे काम सुरू होते. यावेळी काढण्यात आलेला मातीचा ढिगारा नियमाप्रमाणे खोदलेल्या खड्ड्यापासून एक मीटर दूर रचला असता, तर त्या ठिकणी बघ्यापैकी अथवा मदतीला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाचा मातीचा ढिगारा कोसळून जीव गेला नसती. ते सहजपणे टाळता आले असते. बचावाचे काम यशस्वी झाले असते. परंतु, छोट्याशा चुकीमुळे अशी परिस्थिती अनेक सार्वजनिक ठिकाणी अथवा कंपनीमध्ये ओढवते. 

‘चलता है’ वृत्ती किती धोकादायक? 
- बऱ्याचवेळा असे दिसते की, सुरक्षा साधने वापरण्याचा कंटाळा कामगार करतात. तसेच, ‘चलता है’ ही पद्धत किंवा मला काही होत नाही, मला कामाचा अनुभव आहे, हा फाजील आत्मविश्वासही कारणीभूत ठरतो. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच, काही अस्थापनेमध्ये ठेकेदार, मालक यांना, सुरक्षिततेचे नियम, संबंधित सुरक्षा उपकरणे व त्याचा वापर, याची माहिती नसल्याने अथवा याबद्दल अनास्था असल्याने, कामगारांचे व नागरिकांचे जीव आणि एकूणच परिस्थिती धोक्यात येते. म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या व एकूणच देशाच्या उन्नतीसाठी आपण सर्वानी सुरक्षिततेचे नियम पाळणे, उपकरणांचा वापर करणे आणि एकूण सुरक्षिततेविषयी गांभीर्याने घेणे ही काळाची गरज झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com