Kasarwadi Fire Accident : कासारवाडीत टायरचे दुकान व लाकडाच्या वखारीला आग

शेजारील रुग्णालयातील १९ रुग्णांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे १४ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात
Kasarwadi Fire Accident
Kasarwadi Fire Accident sakal

पिंपरी: पुणे -मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील भंगार टायरच्या दुकानाला पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. या ठिकाणापासून मॅक्स न्युरो हाॅस्पिटल जवळच असल्याने तेथील १९ रुग्णांना महापालिकेच्या वायसीएमसह अन्य रुग्णालयात स्थलांतरित केले.

अग्निशमन दलाच्या १४ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली जात आहे. एका जेसीबीच्या सहाय्याने अन्य टायर बाजूला करण्यात आले. शेजारील मैत्री रेसिडेन्सी मधील रहिवाशांनी रुग्णांना स्थलांतरित करण्यासह आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

महामार्गालगत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जय गणेश टायर नावाचे दुकान आहे. सर्व वाहनांचे जुने टायर दुकानासह आवारात होते. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना आग लागली. आगीच्या ज्वाळा उंच होत्या. धुरही खूप होता.

टायर जळत असल्यामुळे दुर्गंधीही येत होती. कल्पना जैन व महावीर जैन माता -पुत्र टायरच्या दुकानाचे मालक आहेत. या दुकानासह शेजारील कोटेश्वर टिंबर या लाकडाच्या वखारीलाही झळ बसली.

अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत शेजारील मैत्री अपार्टमेंटमधील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या दहा बंबांसह पीएमआरडीए, पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व टाटा मोटर्स कंपनी यांचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. एका जेसीबीची मदत घेण्यात आली.

घटना घडली तेव्हा शेजारील मॅक्स न्युरो हाॅस्पिटलमधील रुग्ण झोपेत होते. हाॅस्पिटलचे संचालक डॉ. उमेश फालके यांच्या निगराणीखाली रुग्णांना स्थलांतरित केले. १२ रुग्णांना वायसीएममध्ये, तीन रुग्णांना खासगी रुग्णालयात व चार रुग्णांना घरी पाठवण्यात आले.

आगीत कोणही जखमी झालेले नाही. पण, भितीचे वातावरण आहे. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन पथकाने आगीचा धोका लक्षात घेवुन त्वरित हॉस्पिटलच्या दिशेकडून अग्निशमन कार्य सुरू केले. आता आग आटोक्यात आली असून पाणी मारून धग कमी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com