
वडगाव मावळ : वलवण (लोणावळा) येथील एका ५६ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी (ता. १६) दुपारी मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. तिच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा पहिला मृत्यू झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
संबंधित महिला कॅन्सरग्रस्त होती. ती एक जून रोजी दुबई येथून गोव्याला आली होती. गोवा येथून वैयक्तिक वाहनाने लोणावळ्यातील स्वतःच्या घरी आली होती. १२ तारखेपर्यंत ती होमक्वारंटाइन होती. १२ तारखेला रात्री श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने १३ तारखेला पहाटे उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तिच्या संपर्कातील पती व दोन मुलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधिताचा मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिली घटना आहे. तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या व त्यात कोरोना बाधिताच्या मृत्यूची घटना घडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देहूमध्ये एक पॉझिटिव्ह
देहू : माळवाडी येथे एक महिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ही महिला आपल्या सुनेला आणि 15 दिवसांच्या नातवाला कराड येथे आणण्यासाठी गेली होती. शिरवळ टोल नाक्यावर तपासणीमध्ये ती बाधित असल्याचे आढळून आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.