Hinjewadi Accident : हिंजवडी पोलिसांची कडक कारवाई; डंपरमालकावरही गुन्हा दाखल
Police Action : हिंजवडीत निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या अपघातप्रकरणी पोलिसांनी चालकासोबत मालकांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई सुरू केली आहे.
हिंजवडी : आयटी पंचक्रोशीत चालकांनी अवजड वाहने बेदरकारपणे चालविल्याने गेल्या दोन वर्षांत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. यास लगाम लावण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी चालकांसह मालकांवरही सदोष मनुष्यवधाचा पहिला गुन्हा दाखल केला.