Video : आता पाच मिनिटांत कळणार ‘फिट की अनफिट’; कसे ते पहा?

Health-ATM
Health-ATM

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने भारतात प्रथमच तब्बल २२ आरोग्य तपासण्यांसाठी ‘हेल्थ एटीएम’ डिजिटल मशिनचा प्रयोग सुरू केला आहे. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी प्राथमिक चाचण्यांसाठी विनाडॉक्‍टर असलेले हे मशिन उपयुक्त ठरणार आहे. अवघ्या पाच मिनिटांत तुम्ही ‘फिट आहात की अनफिट’ हे या एटीएमच्या माध्यमातून मिळणाऱ्या रिपोर्टने कळेल. यामुळे एचए कंपनीला नवसंजीवनी मिळणार आहे.

सुरुवातीला राज्यभरात शंभर हेल्थ एटीएमचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. यासाठी एचएने क्‍लिनिक्‍स ऑन क्‍लाऊड या कंपनीसोबत करार केला आहे. विशेष बाब म्हणजे हे एटीएम प्रत्येक जण सहजपणे हाताळू शकतो. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात या एटीएमचा प्रारंभ होणार आहे. मशिनची किंमत अंदाजे तीन लाख रुपये आहे. यामुळे वेळेची बचत होऊन रिपोर्टनुसार पुढील तपासण्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार घेणे शक्‍य होईल.

या २२ तपासण्या होणार
बीएमआय (शरीर वस्तुमान निर्देशांक), बीएमआर (शरीर कॅलरी निर्देशांक), बॉडी फॅट, बॉडी वॉटर, बोन मास, फॅट फ्री वेट, मसल्स मास, प्रोटिन, स्केलेटन मसल्स (सांगाडा), सबकुटेनिअस फॅट (त्वचेखालील चरबी), व्हिसरल फॅट, वजन, फिजीक रेटिंग, मेटाबॉलिक एज (चयापचय), हेल्थ स्कोअर, हाइट, रक्तदाब, मधुमेह, एसपीओटू, पल्स (नाडी), बॉडी टेंपरेचर (ताप) व हिमोग्लोबिन या तपासण्या होणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे विकसित तंत्रज्ञान
ब्लड प्रेशर, ग्लुकोमीटर, बॉडी फॅट ॲनॅलायजर, हिमोग्लोबिनोमीटर, थर्मामीटर, थर्मल प्रिंटर, डिजिटल हाइट सेन्सॉर, ऑक्‍सिमीटर, ॲन्ड्रॉइड टॅबलेट, युपीएस, पल्स ॲण्ड बॉडी सॅच्युरेशन तपासणी, इन्स्टंट रिपोर्ट.

‘हेल्थ एटीएम’ हा सर्वांसाठी उपयुक्त प्रकल्प आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. सद्यःस्थितीत कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठीदेखील हे मशिन उपयुक्त ठरणार आहे. लवकरच यातून ईसीजी रिपोर्टही मिळणार आहे. याशिवाय रुग्णवाहिकेतदेखील हे मशिन लावता येते. 
- नीरजा सराफ, व्यवस्थापकीय संचालक, एचए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com