

Pregnant Woman Rescued Amid Floods as Pimpri-Chinchwad Evacuates Riverbank Families
esakal
पिंपरी : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठच्या आणि सखल भागांमध्ये सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.