esakal | गॅस महागल्यानं खानावळीतील जेवणही महागलं!

बोलून बातमी शोधा

गॅस महागल्यानं खानावळीतील जेवणही महागलं!}

विविध कंपन्या, दुकानात काम करणारे चाकरमानी अशा खानावळींमध्ये जेवण्यास येतात.

गॅस महागल्यानं खानावळीतील जेवणही महागलं!
sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : सर्वच भाज्या, गॅसचे दर महागल्याने आता साधी पोळी-भाजी खायची झाल्यास तीस रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी ४५-५० रूपयांना मिळणारी घरगुती राईस प्लेट शहरात काही ठिकाणी ६० ते १०० रुपयांवर पोहोचली आहे. बहुतांशी भाज्यांच्या भावाने ‘शंभरी’ गाठल्याने थाळीतील काकडी आणि लिंबाची ‘साइज’ कमी केली आहे. विविध कंपन्या, दुकानात काम करणारे चाकरमानी अशा खानावळींमध्ये जेवण्यास येतात. दुपार व रात्रीचे जेवायचे झाल्यास एका माणसाला १२० रुपये मोजावे लागत असल्याने आता बाहेर जेवणही परवडेनासे झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खानावळी असलेला भाग 

 • संत तुकाराम नगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, शाहूनगर, निगडी, चिंचवडगाव 

सध्याचे दर 

 • छोटे हॉटेल, खानावळीत शाकाहारी थाळी : १०० रुपये (पार्सलचा दर : १२० रुपये) 

(पाच चपाती, तीन भाजी, दाल बाटी, मसाला भात, स्वीट डीश लापसी, ताक) 

 • मांसाहरी थाळी : १२० रुपये 

(पाच चपाती किंवा रोटी, चिकन रस्सा, सुक्क चिकन, बिर्याणी, सलाड) 

 • महिना खानावळ : १४०० रुपये 

(चपाती, दाल -भात, दोन भाज्या (अनलिमिटेड) 

 • शाकाहारी भोजनालयात थाळी : ६० रुपये 

(दोन भाज्या, तीन चपात्या, दही-लोणचे, पापड, कोशिंबीर, डाळ-भात) 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 1. हाफ राईस प्लेट : ५० 
 2. सुकी भाजी प्लेट : ५० 
 3. रस्सा भाजी प्लेट व डाळ प्लेटला : ४० 
 4. पोळी ५ 

‘‘आम्ही वेज राईस प्लेटचा दर ६० रुपये ठेवला आहे. सध्या मटण, चिकनचे भाव वाढल्याने मटण आणणेच बंद केले आहे. अंडाकरी, मासळी आणत असलो तरी त्यांचेही दर वाढवावे लागले.’’ 
- संध्या दाभाडे, खानावळ चालक, राजेशिवाजीनगर 

‘‘तीस रुपयांत पोळीभाजी विकायचे, त्यामुळे जास्त गिऱ्हाईक मिळत. आता या महागाई मुळे गणित बिघडले आहे. सोयाबीन, मसाले, बेसन, आटा,डाळी यांचे भाव २५ रुपयाने वाढले. ’’ 
- ज्योती खंडागळे, रुपीनगमधील पोळीभाजी केंद्र चालक 

‘‘पालेभाज्यांऐवजी कडधान्ये खावी लागत आहेत. काकडीऐवजी मुळा दिला जातोय.’’ 
- तुषार पाटील, ग्राहक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही बदल 

 • अनेक पोळीभाजी केंद्रांकडून दरवाढ 
 • खवय्यांच्या सेवेसाठी चार ते पाच भाज्या, कोशिंबिरी 
 • फळभाज्यांसह पालेभाज्या, कडधान्य, टोमॅटो, कांदा, काकडी भावात वाढ 
 • प्रत्येक केंद्राचा दर हा वेगळा असल्याने दरवाढीचे प्रमाणही वेगवेगळे 

थाळी...२०२०...२०२१ 

 • घरगुती राईस प्लेट (व्हेज)...४० ते ६०...१२० 
 • घरगुती राईस प्लेट (नॉनव्हेज)...१२०...१६० ते १८० 
 • मंथली मेस (एक वेळ)...१२०० ते १४००...१६०० 
 • मंथली मेस (दोन वेळ)...२६००...३००० 

कुपण पद्धत 
काही ठिकाणी कुपन पद्धत सुरू केली आहे. १५०० रुपयांत ३० दिवसांचे ३० कुपन खानावळ चालकांकडून दिले जातात. कुपन दाखवून ‘अनलिमिटेड’ जेवन करू शकतात. त्यांना बुधवार आणि रविवारी नॉनव्हेज आहार मिळतो, असे वैजनाथ खानावळीचे अजय मोरे यांनी सांगितले. 

‘‘साधारण भाज्या, पालेभाज्या, कडधान्य तसेच कांदा-बटाटा, टॉमेटो यांचे दर प्रचंड वाढले आहेत. गॅस सिलेंडर महागला असून, हॉटेलच्या जागेचे भाडे, विजेचे बिल, नोकारांचा पगार यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवण्यास भाग पडले. भाड्याच्या जागेत खानावळ सुरू करणाऱ्यांना इतर वाढीव खर्च असतो.’’ 
- नारायण चौहान, ममता भोजनावळ, मोरवाडी