पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव खरात यांचे निधन

Former Pimpri Chinchwad Municipal Corporation corporator Sahebrao Kharat passed away
Former Pimpri Chinchwad Municipal Corporation corporator Sahebrao Kharat passed away

भोसरी  : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव खरात (वय ६७) यांचे मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री कोरोना संसर्गाच्या उपचारादरम्यान  निधन झाले. उत्तम व्याख्याते, बुद्ध-धम्माचे गाढे अभ्यासक असा त्यांचा नावलौकीक होता. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली , नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या  सन २००२ मध्ये झालेल्या निवडणूकीत माजी आमदार विलास लांडे यांच्या अपक्ष पॅनेलमधून ते निवडून आले होते.  सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. ते उत्तम व्याख्याते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी शाहूनगरातील धम्मचक्र बुद्धविहाराच्या माध्यनातून परिसरात धम्माचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांनी बुद्धीस्ट चेंबर ऑफ  कॅामर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर पथसंथेची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे रहाटणीत महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टद्वारे न्यू सिटी प्राइड इंग्लिश स्कूलही सुरू केले आहे. त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात त्यांच्या कामाच्या शैलीमुळे 'घराघरांत खरात' अशी म्हण प्रचलित झाली होती.  

मूळचे ते जालना जिल्ह्यातील रहिवासी होते.  कामासाठी ते पुण्यात आले होते. सुरवातीला त्यांनी गरवारे  कंपनीत काम केले.  पुढे त्यांनी राजीनामा देऊन स्वताचा व्यवसाय सुरू   केला. व्यवसायाबरोबच सामाजिक कार्यात सक्रीय झाले.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी बुधवारी (ता. २) महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली. ती  गुरुवारी (ता. ३) पॅाझीटिव्ह आली. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात गुरुवारी ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्याने ते शुक्रवारी (ता. ४)  भोसरीतील कोवीड रुग्णालयात बेड उपब्ध झाल्यावर दाखल झाले. तेथे सोमवारपर्यंत (ता. ७) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांनी सोमवारी रात्री नेहरुनगरातील जंबो कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे मंगळवारी (ता. ८) रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू  झाला.
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com