लोणावळ्यात चार कोटींची रोकड जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cash seized Lonavla Rural Police

लोणावळ्यात चार कोटींची रोकड जप्त

लोणावळा : लोणावळा ग्रामिण पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी कारवाई करत ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महेश नाना माने (रा. विटा, जि. सांगली), विकास संभाजी घाड़गे (रा. शेटफळ जि.सांगली) यांना ताब्यात घेतले आहे. लोणावळा ग्रामिण पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, द्रुतगती मार्गावरुन अवैध शस्त्र व पैशांची बेकायदशीर वाहतूक होणार असल्याची माहीती मिळाली होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे,  लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनखाली सोमवारी (ता.२८) रात्री महामार्गावर पथक तैनात केले. दरम्यान मुंबईकडुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयीत मारुती स्विफ्ट मोटारीची (केए ५३ एमबी ८५०८) ताब्यात घेण्यात आली. यावेळी  मोटारीची झडती घेण्यात आली असता मोटारीत ४ कोटी रुपयांची रोख रक्कम मिळुन आल्या. ही सर्व रोकड पाचशे रुपयांच्या चलणात आले.

cash seized Lonavla Rural Police

cash seized Lonavla Rural Police

याप्रकरणी मोटार चालक महेश माने, विकास घाडगे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती. आवश्यक कागदपत्रे, वाहतुक परवाना समाधानकारक कारण पोलिसांनी वरील दोघांना देता आली नाही. याप्रकरणी हवालाचा कोणता प्रकार आहे का याचा तपास  पोलिस करत आहे. सदर रकमेसंदर्भात पोलिसांनी आयकर विभागास माहीती दिली. फौजदार सचिन बनकर, अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे,गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Four Crore Cash Seized Lonavla Rural Police Mumbai Pune Expressway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top