जुनी सांगवीत टँकरच्या धडकेत चौघे जखमी

रमेश मोरे 
Monday, 31 August 2020

टँकर चालकाविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : येथे रविवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्र बँक चौक-शितोळेनगर, पीडब्ल्यूडी कॉलनीसमोरील रस्त्यावर टँकरने चौघांना धडक दिली. त्यात चौघे जखमी झाले असून, टँकर चालकाविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डिझेल टँकरवरील (क्रमांक एमएच १४, एचयू ६८७२) चालकाचं नियत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. त्यात रस्त्यानं जाणाऱ्या आशा मुळे (वय ४९, रा. आनंद नगर), यश धावरे (रा. शुक्रवार पेठ), विजय दहिवाल (रा. जुनी सांगवी) आणि विवेक असवले (रा. पिंपळे गुरव) हे चौघे जखमी झाले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघातानंतर चालक टँकर सोडून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तिघांना जुनी सांगवीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर एकास येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुनी सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस आधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four injured in old sangvi due to tanker collision