उस्मानाबादहून मुंबईकडे नेत होते चार टेम्पो गोमांस; मात्र उर्से, सोमाटणे टोलनाक्यावर... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

उस्मानाबाद येथून मुंबईकडे विक्रीसाठी नेत असलेले ६५ लाखांचे २४ टन गोमांस द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाका व सोमाटणे टोल नाक्यावर पकडण्यात आले.

बेबडओहोळ (ता. मावळ) : उस्मानाबाद येथून मुंबईकडे विक्रीसाठी नेत असलेले ६५ लाखांचे २४ टन गोमांस द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाका व सोमाटणे टोल नाक्यावर पकडण्यात आले. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना माहिती मिळाली, की उस्मानाबाद येथून काही टेम्पो गोमांस घेऊन येत आहेत याची माहिती परंदवडी पोलिसांना देऊन त्यांच्या मदतीने उर्से येथे सापळा लावला. त्यांना तीन टेम्पो मुंबईकडे जाताना दिसले. या वाहकांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर कसून तपासणी केली असता भाज्यांच्या खाली हे मास सापडले. यावेळी आखिल भारतीय गोरक्षक समिती, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोसेवक प्रतीक भेगडे, मंगेश नढे, अन्न आरडे, योगेश शेटे, योगेश ढोरे, उपेंद्र बलकवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोमांस वाहतूक करणारे नागनाथ चनप्पा नागेशी (वय २७), लक्ष्मण वसंत वाघमारे (वय २७), अनवर शब्बार शेख (वय २४), लियाकत हमीद मुल्ला (वय २०), राहुल सुरेश बेळे (वय २६), सद्दाम मेहमूद मुजावर (वय २३, सर्व रा. दक्षिण सोलापूर) यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात आखिल भारतीय समितीचे गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली. उर्से येथे तीन, तर सोमाटणे येथे एक टेम्पो, असे एकूण चार टेम्पो घेऊन हे मास मुंबईकडे विक्रीसाठी जात होते. सोमाटणे येथे टेम्पो (क्रमांक एमएच १३, सीयू २६७६) यात सुमारे चार टन मांस आढळून आले. या टेम्पोच्या चालकसह दोघास अटक करण्यात आली असून, त्याना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील मांसाचे काही नमुने घेऊन ते पुणे येथील रासायनिक प्रयोग शाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे व शिरगाव पोलिस चौकीचे उपनिरीक्षक बळवंत गावित हे करत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उस्मानाबादवरून टेम्पो (क्रमांक एमएच १३, सीयू ६३६६), टेम्पो (क्रमांक एमएच १३, एवाय ४५७१), टेम्पो (क्रमांक एमएच ४६, एएफ ५३९५) या तीन वाहनांतून गोमांस भरून मुंबईकडे जात असल्याची माहिती गोरक्षांना मिळाली. बकरी ईदच्या दुसऱ्याच दिवशी हे सर्व गोमांस मुंबईकडे विक्रीसाठी चालवले होते असे समजते .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four tempo beef who taken from osmanabad to mumbai seize at urse, somatane toll plaza