esakal | कंपनीचा संचालक करण्याच्या आमिषानं साडेतीन कोटींची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीचा संचालक करण्याच्या आमिषानं साडेतीन कोटींची फसवणूक

कंपनीत संचालक म्हणून घेण्यासह शेअर्सही नावावर करण्याचे आमिष दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक करण्यात आली.

कंपनीचा संचालक करण्याच्या आमिषानं साडेतीन कोटींची फसवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कंपनीत संचालक म्हणून घेण्यासह शेअर्सही नावावर करण्याचे आमिष दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक करण्यात आली. यासह कंपनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेत धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

टी. पी. विजयन, त्याची पत्नी लतिका विजयन, अनिल मोहिते (रा. वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कीर्तीकुमार चंपकलाल मणियार (वय 62, रा. मुकुंदनगर गुप्ते मार्केट, पुणे) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचा भाऊ विनोद मणियार यांना आरोपींनी विश्‍वासात घेऊन त्यांना ताथवडे येथील विपुल प्लॅस्टिक प्रा.लि. या कंपनीवर संचालक म्हणून घेण्याचे आमिष दाखविले. त्यापोटी तीन कोटी 45 लाख रुपये त्यांना आरोपी व कंपनीच्या नावावर बॅंकेत भरण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही संचालक म्हणून न घेता, शेअर्स नावावर न करता भागिदारही करून घेतले नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी अनिल मोहिते याने फिर्यादी यांच्या मुलाला दमदाटी करून कंपनीत हाकलून दिले. पैसे परत न करण्याची धमकी देऊन कंपनीत येऊ न देता बेकायदेशीरपणे कंपनीचा ताबा घेतला. विजयन दाम्पत्याने विश्‍वासाने घेतलेले तीन कोटी 45 लाख परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. तर त्यांचा साथीदार अनिल मोहिते याचा कुठलाही संबंध नसताना त्याने कंपनीचा ताबा घेत फिर्यादीला कंपनीतून हाकलून देत धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.