vishwajeet barne and siddheshwar barne
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या तीन उमेदवारांना व शिवसेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म उशिरा मिळाले. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची त्यांची संधी हुकली.