Shatrughan kate and Nana Kate
sakal
पिंपरी - शहरात ‘शत-प्रतिशत’चा नारा देणारे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत लढणारे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मधून मात्र सोयीस्कररित्या समोरासमोर न लढता वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे या दोन काटेंमध्ये ‘काटें की टक्कर’ न होता केवळ ‘नुरा कुस्ती’च होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.