'या' किरकोळ कारणावरून मित्रांनी केला सराईत मित्राचा 'गेम'

'या' किरकोळ कारणावरून मित्रांनी केला सराईत मित्राचा 'गेम'

पिंपरी : 'एमएम' नावाचा टॅटू काढल्याच्या वादातून मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना भोसरीतील दिघी रोड येथे उघडकीस आली. खुनानंतर आरोपी लातूरला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, मोबाईल लोकेशनच्या आधारे सात आरोपींना पाटस टोलनाक्‍यावर अटक केली. 

मयूर हरिदास मडके (रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचे मित्र रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातूर), प्रणेश चंद्रकांत घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क, दिघी), वैभव तानाजी ढोरे (रा. भवानी पेठ, कासेवाडी), सुभाष शेकापूर (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) व अजय वानखेडे (वय 19, रा. कासेपूर झोपडपट्टी) यांना अटक केली आहे. मृत मयूर व आरोपी जवळचे मित्र असून, शनिवारी (ता. 8) रात्री अकराच्या सुमारास ते मद्यपान करीत बसले होते. दरम्यान, जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच 'एमएम' नावाचा टॅटू काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मयूर मडके व मंगेश मोरे या दोघांच्या नावाची सुरुवात 'एमएम' या अक्षराने होते. त्यामुळे हातावर त्या नावाचा टॅटू काढला होता. मात्र, 'एमएम' नक्की कोणाचा या वर्चस्व वादातून आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी लातूरला पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी सोलापूर महामार्गाने पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला. त्यांना पाटस टोलनाकावर ताब्यात घेतले. मृत मयूर याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही कारवाई भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शंकर अवताडे, सहायक निरिक्षक सिद्धेश्‍वर कैलासे, उपनिरिक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, आशिष गोपी, संतोष महाडिक यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com