- अविनाश ढगे
पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने भावी नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाले आहे. कामांच्या निमित्ताने का होईना जनता अन् नेत्यांच्या मनात स्थान भक्कम करण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. सव्वातीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर काहींच्या महापालिकेत चकरा सुरू झाल्या आहेत.