
Chinchwad Roads
Sakal
चिंचवड : मोरया चौकातील बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात अवघ्या एका रात्रीत या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण, तो महिनाभरातच पुन्हा पूर्वीसारखा झाला आहे. हे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देत नाराजी व्यक्त केली.